CSAT MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for CSAT - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on Jun 19, 2025

पाईये CSAT उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा CSAT एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest CSAT MCQ Objective Questions

CSAT Question 1:

एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दुमकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासांत युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट याकडे दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापनेसाठी विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ....

  1. शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जगातील विविध संघर्षासंबंधाने चर्चा करून संबंधित पक्षांतील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्याल.
  2. मर्दुमकीच्या युद्धाच्या, देशभक्तीच्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्याखेरीज देशाच्या संरक्षणासाठी सैन्यांत दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण-तरुणी घडवणे शक्य नाही हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळाल.
  3. अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासून त्याआधारे इतिहास अभ्यासक्रमांतील विविध संघर्षांचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्यांच्या समाजावर झालेल्या दीर्घकालीन परिणामांचे आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायला अध्यापकांना प्रोत्साहन द्याल.
  4. 'युद्ध म्हणजे मर्दुमकी नसून स्वतःला विचारी म्हणवणाऱ्या माणसाचं ते अपयश आहे. मूर्खपणा व क्रौर्य यांचा अनुभव घेणाऱ्या सैनिकासाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल. 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : 'युद्ध म्हणजे मर्दुमकी नसून स्वतःला विचारी म्हणवणाऱ्या माणसाचं ते अपयश आहे. मूर्खपणा व क्रौर्य यांचा अनुभव घेणाऱ्या सैनिकासाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल. 

CSAT Question 1 Detailed Solution

CSAT Question 2:

तुम्ही बसमध्ये आहात. तुमची बस तुमच्या थांब्यावर पोहोचते पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढले नाही. तुम्ही काय कराल ?

  1. चालका जवळ पैसे देऊन त्यांना सांगेन की ते वाहकाला द्या.
  2. पेच टाळण्यासाठी पटकन बाहेर उडी मारेन.
  3. वाहकाला बोलावून पैसे देईन व तिकीट घेईन.
  4. वाहकाला देण्यासाठी जवळ बसलेल्या एखाद्याला पैसे देईन.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : वाहकाला बोलावून पैसे देईन व तिकीट घेईन.

CSAT Question 2 Detailed Solution

CSAT Question 3:

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयी पासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ?

  1. मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
  2. दारू पिण्यास नकार देईन.
  3. फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
  4. नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : दारू पिण्यास नकार देईन.

CSAT Question 3 Detailed Solution

CSAT Question 4:

जलस्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्ताराने माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याचा पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वत:लाच स्वतः च्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्ही ...

  1. स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल.
  2. पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतः चा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल.
  3. परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल.
  4. पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल.

CSAT Question 4 Detailed Solution

CSAT Question 5:

2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे.

जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही

  1. नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल.
  2. पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्वांशी संरेखित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
  3. नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल.
  4. अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल.

CSAT Question 5 Detailed Solution

Top CSAT MCQ Objective Questions

मिना, जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मिनाला 5/8 मिळाली, जीवाला 0.25 आणि फारूला 75 रूपये मिळाले.

मूळ रक्कम दर्शविणारा पर्याय निवडा.

  1. 700
  2. 600
  3. 550
  4. 450

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : 600

Comprehension:

​खालील उतारा वाचून प्र. ची उत्तरे द्या.

मोटर्स अशी उपकरणे आहेत जी विद्युत उर्जेला यांत्रिक उर्जेत रूपांतरीत करतात. मूलतः मोटरचे कार्य जनित्रच्या उलट चालते. यात गुंडाळी फिरवून विद्युतप्रवाह निर्माण करण्याऐवजी, बॅटरीद्वारे गुंडाळीला विद्युतप्रवाह पुरवला जातो आणि विद्युतप्रवाह वाहणाऱ्या गुंडाळीवर कार्य करणाऱ्या पीडन परबलामुळे ते फिरते. परीभ्रमी धात्राला बाह्य उपकरणाशी जोडून उपयुक्त यांत्रिक कार्य केले जाऊ शकते. तथापि गुंडाळी चुंबकीय क्षेत्रात फिरत असताना, बदलणारे चुंबकीय प्रवाह, गुंडाळीत एक विद्युतगामक प्रेरित करते; हे प्रेरित विद्युतगामक, गुंडाळीतील विद्युतप्रवाह कमी करण्यासाठी कार्य करते. जर असे झाले नाही तर, लेन्झच्या नियमाचे उल्लंघन होईल. धात्राचा घूर्णन वेग वाढल्याने माघारी विद्युतगामक परिमाणात वाढ होते. (माघारी विद्युतगामक हा वाक्यांश एक विद्युतगामक दर्शविण्यासाठी वापरला जातो, जो पुरवठा केलेला विद्युत प्रवाह कमी करतो.) विद्युतप्रवाह पुरवण्यासाठी उपलब्ध विद्युतदाब पुरवठा हा विद्युतदाब आणि माघारी विद्युतगामक यांच्यातील फरकाच्या बरोबरीचे असल्यामुळे, फिरणाऱ्या वेटोळ्यातील विद्युतप्रवाह मागील बाजूने मर्यादित असतो.

जेव्हा मोटर चालू केली जाते, तेव्हा सुरुवातीला कोणतेही माघारी विद्युतगामक नसते. अशावेळी प्रवाह खूप मोठा असतो कारण तो फक्त वेटोळ्याच्या प्रतिकाराने मर्यादित असतो. वेटोळे फिरू लागल्यावर, प्रेरित माघारी विद्युतगामक लागू विद्युतदाबाला विरोध करते आणि वेटोळ्यांमधील विद्युतप्रवाह कमी होतो. यांत्रिक भार वाढल्यास मोटर मंदावते. यामुळे माघारी विद्युतगामक कमी होतो. ही माघारी विद्युतगामकातील घट, वेटोळ्यातील विद्युतप्रवाह वाढवते आणि त्यामुळे बाह्य विद्युतदाबातील स्रोतापासून आवश्यक शक्ती देखील वाढते.

या कारणास्तव मोटर सुरू करण्यासाठी आणि ती चालवण्यासाठी, उर्जेची आवश्यकता हलक्यापेक्षा जास्त भारांसाठी जास्त आहे. जर मोटारला भार - विरहीत चालवण्याची परवानगी असेल तर माघारी विद्युतगामक अंतर्गत उर्जा आणि घर्षणामुळे होणारी उर्जेची हानी भरून काढण्यासाठी विद्युतप्रवाह कमी करते.

जर खूप जास्त भार असताना मोटर सुरू केली तर ती फिरू शकत नाही. त्यामुळे माघारी विद्युतगामकाच्या कमतरतेमुळे मोटारच्या वायरमध्ये धोकादायकपणे उच्च विद्युतप्रवाह होऊ शकतो. या समस्येचे निराकरण न केल्यास आग लागू शकते.

मोटरसाठी विद्युतघटाची भूमिका काय असते ?

  1. गुंडाळी फिरवून विद्युतप्रवाह निर्माण करणे
  2. गुंडाळीला विद्युतप्रवाह पुरविणे
  3. चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे
  4. यांत्रिक उर्जा पुरविणे

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : गुंडाळीला विद्युतप्रवाह पुरविणे

CSAT Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

बरोबर उत्तर पर्याय २ आहे.

महत्वाचे मुद्दे

  • एक मोटर विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करून कार्य करते, ज्यासाठी विद्युत प्रवाहाचा स्थिर पुरवठा आवश्यक असतो.

  • बॅटरी ही बाह्य उर्जा स्त्रोत म्हणून काम करते जी मोटरमधील लूपला हा प्रवाह पुरवते .

  • जनरेटरच्या विपरीत, जिथे फिरणारा लूप विद्युत प्रवाह निर्माण करतो, मोटरमध्ये, प्रथम विद्युत प्रवाह पुरवला जातो , ज्यामुळे लूप फिरतो.

  • हा पुरवलेला प्रवाह चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधून मोटरच्या आर्मेचरमध्ये हालचाल निर्माण करतो.

  • म्हणूनच, बॅटरीची प्राथमिक भूमिका यांत्रिक ऊर्जा निर्माण करणे किंवा थेट चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे नाही, तर मोटरच्या रोटेशनला सुरुवात करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विद्युत ऊर्जा वितरीत करणे आहे .

  • म्हणून बरोबर उत्तर पर्याय २ आहे.

एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दुमकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासांत युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट याकडे दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापनेसाठी विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ....

  1. शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जगातील विविध संघर्षासंबंधाने चर्चा करून संबंधित पक्षांतील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्याल.
  2. मर्दुमकीच्या युद्धाच्या, देशभक्तीच्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्याखेरीज देशाच्या संरक्षणासाठी सैन्यांत दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण-तरुणी घडवणे शक्य नाही हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळाल.
  3. अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासून त्याआधारे इतिहास अभ्यासक्रमांतील विविध संघर्षांचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्यांच्या समाजावर झालेल्या दीर्घकालीन परिणामांचे आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायला अध्यापकांना प्रोत्साहन द्याल.
  4. 'युद्ध म्हणजे मर्दुमकी नसून स्वतःला विचारी म्हणवणाऱ्या माणसाचं ते अपयश आहे. मूर्खपणा व क्रौर्य यांचा अनुभव घेणाऱ्या सैनिकासाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल. 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : 'युद्ध म्हणजे मर्दुमकी नसून स्वतःला विचारी म्हणवणाऱ्या माणसाचं ते अपयश आहे. मूर्खपणा व क्रौर्य यांचा अनुभव घेणाऱ्या सैनिकासाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल. 

तुम्ही बसमध्ये आहात. तुमची बस तुमच्या थांब्यावर पोहोचते पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढले नाही. तुम्ही काय कराल ?

  1. चालका जवळ पैसे देऊन त्यांना सांगेन की ते वाहकाला द्या.
  2. पेच टाळण्यासाठी पटकन बाहेर उडी मारेन.
  3. वाहकाला बोलावून पैसे देईन व तिकीट घेईन.
  4. वाहकाला देण्यासाठी जवळ बसलेल्या एखाद्याला पैसे देईन.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : वाहकाला बोलावून पैसे देईन व तिकीट घेईन.

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयी पासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ?

  1. मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
  2. दारू पिण्यास नकार देईन.
  3. फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
  4. नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : दारू पिण्यास नकार देईन.

जलस्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्ताराने माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याचा पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वत:लाच स्वतः च्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्ही ...

  1. स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल.
  2. पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतः चा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल.
  3. परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल.
  4. पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल.

2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे.

जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही

  1. नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल.
  2. पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्वांशी संरेखित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
  3. नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल.
  4. अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल.

एक अपराधी समाविष्ट असलेल्या पाच संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त तीन व्यक्ती नेहमी खरे बोलणाऱ्या असतील तर अपराधी निवडा.

अली :  देवने अपराध केला.

सिन्थिया : इला निरपराध आहे.

इला : बानू खरं बोलतेय.

बानू : ती मी नाही.

देव : माझ्यावर दोषारोप करताना अली खोटं बोलतोय.

  1. इला
  2. सिन्थिया
  3. अली
  4. बानू

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : इला

आफ्रिकेत ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांची शेती सुमारे 5000-6000 वर्षांपूर्वी सुरू झाली, तर कोडो, सावा आणि वरई ही धान्ये येथेच जन्मली म्हणून त्यांना भारताची वारसा पिके म्हटले जाते. या सहस्रकांदरम्यान भरड पिकांची शरीरवैशिष्ट्ये जलवायूमानासंदर्भात लवचीक तसेच जैविक आणि अजैविक तणाव सहन करण्यासाठी विकसित झाली आहेत. तांदूळ, गहू यासारख्या C3 गट पिकांच्या तुलनेत 'C4' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या गटातील पिके असून ती स्वतःच 500 पटीने उत्क्रांत झाली आहेत. C4 पिकांतील मेसोफिल पेशी आणि आवरणयुक्त गठ्ठा पेशी त्यांना प्रकाशसंश्लेषणदृष्ट्या कार्यक्षम बनवतात. प्रकाश श्वासोच्छवास प्रक्रियेत ती काहीही गमावत नाहीत. त्यांना जास्त खत किंवा पावसाची गरज नसते. उत्क्रांती प्रक्रियेतून मिळालेली परागकणांची सुपीकता आणि पुनरुत्पादक रचना, उच्च तापमानात तगण्याची क्षमता व त्यांच्याकडे वेगवान दुष्काळ सुटका यंत्रणा आहे. दुष्काळाची शक्यता जाणवताच स्वतःचे जीवनचक्र गतिमान करून C3 पिकांच्या तुलनेत ती चांगले उत्पादन देतात. कालौघात यशस्वीपणे प्रवास करून भरड धान्ये जन्मजात पौष्टिक गुणांनी युक्त आहेत.

पुढील पर्यायांतून वरील माहितीवरून काढलेला विश्वसनीय निष्कर्ष ठरेल असे एक विधान निवडा.

  1. गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन कमी करणे शक्य नाही कारण ती नगदी पिके म्हणून उत्पादित केली जातात.
  2. जोपर्यंत लोक भरड धान्यांचा अन्नात समावेश करत नाहीत आणि त्यांची चव विकसित करत नाहीत तोपर्यंत भरड पिकांचे व्यवसायिक उत्पादन वाढवणे फायदेशीर ठरणार नाही.
  3. दिलेली भरड पिकांची वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे होणारे प्रदूषण अल्प असेल, कमी गुंतवणूक करून शेतकरी त्यांची पैदास करू शकतील आणि त्यांच्या पोषणमुल्यांमुळे अन्नसुरक्षाही मार्गी लागेल. (4) गव्हातील ग्लुटेनमुळे त्याच्यापासून चवदार पदार्थ बनवता येतात, मोठी लोकसंख्या ते आवडीने खातात, सवयीचे आहेत
  4. आणि खाण्याच्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत त्यामुळे भरड पिकांचे उत्पादन वाढवणे फायदेशीर ठरणार नाही. 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : दिलेली भरड पिकांची वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे होणारे प्रदूषण अल्प असेल, कमी गुंतवणूक करून शेतकरी त्यांची पैदास करू शकतील आणि त्यांच्या पोषणमुल्यांमुळे अन्नसुरक्षाही मार्गी लागेल. (4) गव्हातील ग्लुटेनमुळे त्याच्यापासून चवदार पदार्थ बनवता येतात, मोठी लोकसंख्या ते आवडीने खातात, सवयीचे आहेत

शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या. होती.

  1. 5700
  2. 6000
  3. 7500
  4. 8000

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : 8000
Get Free Access Now
Hot Links: teen patti master purana teen patti star apk teen patti game online