म्हणी व वाक्प्रचार MCQ Quiz - Objective Question with Answer for म्हणी व वाक्प्रचार - Download Free PDF

Last updated on Apr 22, 2025

Latest म्हणी व वाक्प्रचार MCQ Objective Questions

म्हणी व वाक्प्रचार Question 1:

पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ सांगा.

'दत्त म्हणून उभा राहणे.'

  1. अंदमानातून सुटका होणे
  2. आकस्मिक हजर होणे
  3. लगबगीने सामोरे जाणे
  4. आवेशात हजर राहणे
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : आकस्मिक हजर होणे

म्हणी व वाक्प्रचार Question 1 Detailed Solution

उत्तर - दत्त म्हणून उभा राहणे या वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ आकस्मिक हजर होणे हा होईल.

वाक्यात उपयोग - माझा मित्र एके दिवशी माझ्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

म्हणी व वाक्प्रचार Question 2:

‘कानाडोळा करणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा. 

  1. कानावर घालणे
  2. कानामागे टाकणे
  3. कान टोचणे
  4. कानाला खडा लावणे
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कानामागे टाकणे

म्हणी व वाक्प्रचार Question 2 Detailed Solution

उत्तर - कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कानामागे टाकणे हा होईल.

कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ दुर्लक्ष करणे हा होईल.

वाक्यात उपयोग - शिक्षक अनेक विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करत होते म्हणून त्यांचे वर्तन बिघडत जात होते.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.  

Additional Information

  • कानावर घालणे म्हणजे एखादी गोष्ट लक्षात आणून देणे होय.
    • वाक्यात उपयोग - मोबाईलच्या नादात आपले अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे ही गोष्ट बाबांनी किशनच्या कानावर घातली.
  • कान टोचणे म्हणजे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे होय.
    • वाक्यात उपयोग - आपल्या आईवडिलांशी उद्धटपणे वागत असल्यामुळे गुरुजींनी सुरेशचे कान टोचले होते.
  • कानाला खडा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे होय.
    • वाक्यात उपयोग - अमितने आपल्या नकारात्मक मित्रांपासून दूर राहण्यासाठी स्वतःच्या कानाला खडा लावला.    

म्हणी व वाक्प्रचार Question 3:

‘काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीचा नेमका अर्थ काय? 

  1. आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे
  2. गेलेल्या गोष्टीचा शोक करत बसणे
  3. धावा धाव करणे
  4. नको त्या गोष्टीचा शोध घेणे
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे

म्हणी व वाक्प्रचार Question 3 Detailed Solution

उत्तर - काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

म्हणी व वाक्प्रचार Question 4:

'पळून जाणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. 

  1. पाठ पुरविणे
  2. पाठ दाखविणे
  3. पाठ राखणे
  4. पाठीशी घालणे
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : पाठ दाखविणे

म्हणी व वाक्प्रचार Question 4 Detailed Solution

उत्तर - पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार पाठ दाखविणे हा होईल.

वाक्यात उपयोग - संकटाच्या काळात सुयश आपल्या मित्रांना पाठ दाखवून निघून गेला.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

Additional Information

  • पाठ पुरविणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी सारखे मागे लागणे असा होतो.
    • वाक्यात उपयोग - शिक्षक नेहमी वर्गात चांगल्या गोष्टीसाठी पाठ पुरवत असत.
  • पाठ राखणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी समर्थन देणे असा होतो.
    • वाक्यात उपयोग - आई-वडील नेहमी आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टीसाठी पाठ राखण करत असत.
  • पाठीशी घालणे याचा अर्थ संरक्षण देणे असा होतो.
    • वाक्यात उपयोग - राहूल आपल्या मित्राला त्याच्या चुकांसाठी नेहमी पाठीशी घालत असे.

म्हणी व वाक्प्रचार Question 5:

'वाईट काम करणान्याला सतत धास्ती वाटते' हा अर्थ व्यक्त करणारी म्हण शोधा.

  1. खाई त्याला खवखवे
  2. साखरेचे खाणार त्याला देव देणार
  3. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  4. खायला काळ आणि भुईला भार

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : खाई त्याला खवखवे

म्हणी व वाक्प्रचार Question 5 Detailed Solution

उत्तर: 1) खाई त्याला खवखवे

Key Points
स्पष्टीकरण:

  • खाई त्याला खवखवे: वाईट काम करणाऱ्याला सदैव धास्ती किंवा भीती वाटते, कारण त्याच्या चुकीच्या कृत्यांचा त्याला त्रास होतो. ही म्हण दिलेल्या अर्थाशी जुळते.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार: चांगले कर्म करणाऱ्याला फळ मिळते, ही सकारात्मक कृतीशी संबंधित आहे.
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी: ऐशआराम किंवा पूर्ण उपासमार या दोन टोकांमध्ये जगणे, ही म्हण दिलेल्या अर्थाशी संबंधित नाही.
  • खायला काळ आणि भुईला भार: निरुपयोगी आणि फक्त जमिनीवर ओझे असणे, याचा अर्थ वाईट कृत्याच्या भीतीशी संबंधित नाही.

म्हणून, 'खाई त्याला खवखवे' ही म्हण 'वाईट काम करणाऱ्याला सतत धास्ती वाटते' या अर्थाला सुसंगत आहे.

Top म्हणी व वाक्प्रचार MCQ Objective Questions

'रिठावर दिवा लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा.

  1. हुशारी दाखविणे
  2. संकटाशी लढणे
  3. वंश चालविणे
  4. ज्ञानाचा प्रकाश पाडणे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : वंश चालविणे

म्हणी व वाक्प्रचार Question 6 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- वंश चालविणे

वाक्प्रचार- वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.

रिठावर दिवा लावणे’ या वाक्प्रचारातील ‘रीठ’ म्हणजे ‘ओसाड जागा’ आणि ‘रिठावर दिवा लावणे’ म्हणजे ‘संतान होणे.

अशा प्रकारे वंश चालविणे हा पर्याय योग्य आहे.

'नाकाचा बाल' या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

(a) अत्यंत अडचणीची परिस्थिती

(b) अत्यंत सुरक्षित

(c) अत्यंत अप्रिय व्यक्ती

(d) अत्यंत प्रिय व्यक्ती

  1. फक्त (a) व (c) बरोबर, (b) व (d) चूक
  2. फक्त (c) व (d) बरोबर, (a) व (b) चूक
  3. फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक
  4. फक्त (b) बरोबर, (a), (c) व (d) चूक

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक

म्हणी व वाक्प्रचार Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक

स्पष्टीकरण- नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय / जिवलग व्यक्ती

अशा प्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ (d) अत्यंत प्रिय व्यक्ती हा पर्याय योग्य आहे.

Additional Informationम्हण-

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

महापुरें झाडें जाती । तेथें लव्हाळें वाचतीं । या म्हणीची समानार्थी म्हण कोणती ?

  1. उथळ पाण्याला खळखळाट फार
  2. दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी
  3. जशी देणावळ तशी धुणावळ
  4. कोळसा उगाळावा तितका काळाच

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी

म्हणी व वाक्प्रचार Question 8 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी

म्हण-

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. 

- राबता असणे. 

  1. सराव असणे. 
  2. लोकांची सतत ये-जा असणे 
  3. समृद्धी येणे 
  4. सतत कष्ट करणे 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : लोकांची सतत ये-जा असणे 

म्हणी व वाक्प्रचार Question 9 Detailed Solution

Download Solution PDF

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.

राबता असणे या वाक्प्रचार योग्य अर्थ लोकांची सतत ये-जा असणे असा होतो.

वाक्यात उपयोग- सरपंचांच्या कार्यालयात दररोज माणसांचा राबता असतो. 

व्यासंग असणे - याचा अर्थ _____ 

  1. अतिशय मेहनत करणे
  2. विषयाचा गाढा अभ्यास असणे
  3. धार्मिक विधी करणे
  4. व्यवसाय करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : विषयाचा गाढा अभ्यास असणे

म्हणी व वाक्प्रचार Question 10 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - व्यासंग असणे याचा अर्थ विषयाचा गाढा अभ्यास असणे हा होतो.

वाक्यात उपयोग - अमितची मराठी अध्यापनशास्त्रात चांगली व्यासंगता होती.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

Additional Informationहाडाची काडे करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे होय.

आर्थिक नफा प्राप्त करण्यासाठी वस्तू व सेवांची केली जाणारी देवाणघेवाण म्हणजेच व्यवसाय करणे होय.

मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?

  1. लक्ष वेधून घेणे
  2. शिकस्त करणे
  3. वेठीस धरणे
  4. शरपंजरी पडणे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : वेठीस धरणे

म्हणी व वाक्प्रचार Question 11 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना वेठीस धरणे या वाक्प्रचारातून व्यक्त होते.

वेठीस धरणे म्हणजे अडवून ठेवणे होय.

वाक्यात उपयोग - जमीनदार नेहमी शेतमजुरांना वेठीस धरण्याचे काम करत असत.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

 Additional Information

  • लक्ष वेधून घेणे म्हणजे एखाद्याचे मन वेधून घेणे होय.
    • वाक्यात उपयोग - वक्त्याने आपल्या बोलण्याने सर्व श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
  • शिकस्त देणे म्हणजे पराभव करणे होय.
    • वाक्यात उपयोग - अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला शिकस्त दिली.
  • प्रयत्नाची शिकस्त करणे म्हणजे आटोकाट प्रयत्न करणे होय.
    • वाक्यात उपयोग - अविने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली.
  • शरपंजरी पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची सर्व शक्ती आणि सामर्थ्य संपणे होय.
    • वाक्यात उपयोग - अंगात घुसलेल्या बाणांमुळे भीष्म पितामह युद्धभूमीवर अक्षरशः शरपंजरीच पडले होते.

पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

  1. वेदना होणे
  2. वाईट वाटणे
  3. राग येणे
  4. असूया वाटणे

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : असूया वाटणे

म्हणी व वाक्प्रचार Question 12 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ असूया वाटणे हा होतो.

वाक्यात उपयोग - आपल्या मित्राने घेतलेली नवीन गाडी बघून सुरेशच्या पोटात दुखू लागले.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

Additional Informationवेदना होणे म्हणजे दुःखदायक जाणीव होणे होय.

खेद वाटणे म्हणजे वाईट वाटणे होय.

अंगाचा तिळपापड होणे म्हणजे राग येणे होय.

'एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे' या अर्थाचे वाक्प्रचार कोणते ?

(a) कानी कपाळी रडणे

(b) कानात बोटे घालणे

(c) कानाला खडा लावणे

(d) कानावर हात ठेवणे

  1. केवळ (a) आणि (c) बरोबर
  2. केवळ (b) आणि (d) बरोबर
  3. केवळ (a), (b) आणि (d) बरोबर
  4. केवळ (b), (c) आणि (d) बरोबर

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : केवळ (b) आणि (d) बरोबर

म्हणी व वाक्प्रचार Question 13 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- केवळ (b) आणि (d) बरोबर

वाक्प्रचार- वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.

'एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे' या अर्थाचे वाक्प्रचार (b) कानात बोटे घालणे आणि (d) कानावर हात ठेवणे हे होतात.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

(a)

पाणी पडणे

(i)

आशा सोडणे

(b)

पाणी मुरणे

(ii)

पराभव करणे

(c)

पाणी पाजणे

(iii)

गुप्तकट शिजत असणे

(d)

पाणी सोडणे

(iv)

वाया जाणे

  1. (a) - (i), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (iii)
  2. (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
  3. (a) - (iii), (b) - (ii), (c) - (i), (d) - (iv)
  4. (a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

म्हणी व वाक्प्रचार Question 14 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

वाक्प्रचार योग्य अर्थ
पाणी पडणे वाया जाणे
पाणी मुरणे गुप्तकट शिजत असणे
पाणी पाजणे
पराभव करणे
पाणी सोडणे आशा सोडणे

दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 

- दृष्टीआड सृष्टी 

  1. दृष्टीत दोष असणे 
  2. दुर्लक्ष करणे 
  3. आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 
  4. दृष्टीशिवाय आपणाला सृष्टी दिसू शकत नाही 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 

म्हणी व वाक्प्रचार Question 15 Detailed Solution

Download Solution PDF

म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही हा होतो.

Hot Links: teen patti real cash game teen patti master gold download all teen patti teen patti dhani